अणदूर | प्रतिनिधी — आवाज महाराष्ट्र न्यूज
जवाहर विद्यालय, अणदूर येथे आज मंगळवार (दि. 17 डिसेंबर) रोजी पोलीस पाटील दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अणदूर विद्यानगरीचे पोलीस पाटील मा. श्री. जावेद शेख यांचा विद्यालयाच्या वतीने शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गोपाळ कुलकर्णी हे होते. यावेळी श्री. मसुते सर यांनी पोलीस पाटील यांची जबाबदारी, सामाजिक क्षेत्रातील योगदान, ते करत असलेली विविध कामे तसेच गावातील सामाजिक शांतता राखण्यात असलेली भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली.
मुख्याध्यापक श्री. कुलकर्णी सर यांनी आपल्या भाषणात जवाहर विद्यालयाचे माजी विद्यार्थी व आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून मा. जावेद शेख यांचा उल्लेख करत विद्यार्थी सुरक्षा समितीमधील त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना पोलीस पाटील श्री. जावेद शेख यांनी सामाजिक सलोखा जपणे, विद्यार्थी सुरक्षितता, सण-उत्सवाच्या काळातील जबाबदाऱ्या तसेच गावपातळीवरील प्रशासनात पोलीस पाटील यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक श्री. किरण गायकवाड सर, वरिष्ठ लिपिक श्री. श्रीशैल वाले सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोहित मोरे सर यांनी केले.
पोलीस पाटील दिनानिमित्त गावपातळीवरील प्रशासनाचा कणा असलेल्या सर्व पोलीस पाटील यांना आवाज महाराष्ट्र न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा!






