spot_img
spot_img
spot_img

महाविकास आघाडीचा रणशिंग फुंकला! पंचायत समिती गटासाठी विशाल भैया शेटे यांचे नाव अंतिम

तुळजापूर (प्रतिनिधी):पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने थेट सत्ताधाऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा निर्णय घेतला असून, संबंधित गटासाठी लढवय्या, आक्रमक आणि जनतेचा खरा आवाज असलेल्या विशाल भैया शेटे यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात भूकंपसदृश हालचाली सुरू झाल्या आहेत.सत्तेच्या दडपशाहीविरोधात कायम आक्रमक भूमिका घेणारे विशाल भैया शेटे हे नाव जाहीर होताच विरोधकांची गणिते कोलमडली असून, “हा सामना आता एकतर्फी होणार” अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. महाविकास आघाडीने फक्त उमेदवार नाही तर लढाई जिंकणारा योद्धा मैदानात उतरवला असल्याचे स्पष्ट झाले आहे.जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा नेता, अन्यायाविरोधात आवाज बुलंद करणारा चेहरा आणि विकासासाठी ठाम भूमिका — या तिन्ही गोष्टी विशाल भैया शेटे यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. त्यामुळेच महाविकास आघाडीने कोणतीही तडजोड न करता त्यांचे नाव निश्चित केले आहे.

या निर्णयानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला असून, “आता हा गट जिंकून दाखवायचाच” असा एल्गार करण्यात येत आहे. येणारी निवडणूक ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून, सत्तेच्या माजाविरुद्ध जनतेचा कौल ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या