आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट
जळकोट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा महाविकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचार सभेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ जाहीर सभेत काँग्रेसची विचार धारा संपण्याचा डाव या लोकांनी रचलेला आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बोलत होते. जळकोट जिल्हा परिषद मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. प्रतीक्षा गोपाळ सुरवसे जळकोट पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन चव्हाण व होर्टी पंचायत समिती गणातून उभे असलेले महाविकास आघाडीच्या सौ. सुवर्णा संजय गुंजोटे यांच्या प्रचारार्थ जळकोट येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी हनुमंत सुरवसे हे होते. यावेळी बोलताना देशातील सर्वसामान्य गोरगरिबांसाठी असलेली काँग्रेसची विचारधारा संपण्याचा विरोधकांचा डाव आहे हा डाव हाणून पाडण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ त्यांनी केले. या सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर असे म्हणाले की धाराशिव जिल्ह्याच्या जनतेसाठी विरोधकाची भूमिका मी ठामपणे मांडत आहे. ज्यांच्या घरात चाळीस वर्षापासून सत्ता आहे तरी देखील जिल्ह्याचा विकास का झाला नाही.असा सवाल करून धाराशिवला मेडिकल कॉलेज सुरू केले, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून जळकोट वाडी, मानमोडी व चिचकोरी तांडा येथील रस्त्याचे डांबरीकरण केले. बोरगाव ते जळकोट लिंक लाईनचे काम केले. जळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशुभीकरण, सिमेंट रस्ते, व जलजीवन अंतर्गत विविध गावची कामे पूर्ण केली. ही विकास कामे आम्ही असे करतो नुसते बोलत नाही असे ओमराजे निंबाळकर म्हणाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांना आवाहन केले. या प्रचार सभेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम,सत्यवान भाऊ सुरवसे, शिवसेनेचे तालुका संघटक कृष्णात मोरे, अनिल छत्रे, ब्रह्मानंद कदम, गोपाळ सुरवसे, अतुल कलशेट्टी, रोहन पाटील, संजय वाघोले, सरपोदिन पटेल, संजय गुंजोटे, सुरज जाधव, मेहबूब बागवान महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






