spot_img
spot_img
spot_img

श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळेचा स्वयंशासन दिन व राजर्षी शाहू महाविद्यालयाचा निरोप समारंभ साजरा

आवाज महाराष्ट्र न्युज रिपोर्टर विजय पिसे जळकोट

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे दि.4 फेब्रुवारी 2026 वार बुधवार रोजी श्री कुलस्वामिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन राजर्षी शाहू कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता १२वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोटचे सचिव तथा प्राचार्य संतोष चव्हाण साहेब तर प्रमुख पाहूणे म्हणून प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय आशा पवार मॅडम, माध्यमिक आश्रम शाळेचे जेष्ठ शिक्षक नागेंद्र गुरव, श्रीमती शांताबाई चौगुले यांची उपस्थिती होती. पहिली ते सातवी व माध्यमिक आश्रमशाळेतील आठवी ते नववी वर्गास अध्यापनाचे कार्य केले. सकाळी परिपाठ ते सायंकाळी वंदे मातरम् गीता पर्यंत शाळा चालवली. प्राथमिक आश्रम शाळचे मुख्याध्यापिका नेहा एकनाथ राठोड, उपमुख्याध्यापक मल्लिनाथ हसनप्पा वासुदेव माध्यमिकचे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक समाधान प्रल्हाद राठोड उपमुख्याध्यापिका शितल सुनिल चव्हाण म्हणून , प्राचार्य रणसुरे शुभांगी तर सेवक म्हणून युवराज यंपाळे, विष्णु आडे, राज उलमुलगे , जय पवार , सुरज कांबळे यांनी काम पाहिले. दहावी वर्गातील 64 कॉलेज चे 30 विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून भूमिका पार पाडली. यासाठी देवानंद पांढरे, बिळेणसिद्ध हक्के, सुरेश कोकाटे, संतोष दुधभाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्वयंशासन दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत उत्कृष्ट अध्यापन केले. त्यातील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक देण्यात आले. प्रथम चव्हाण मोनिका रमेश, द्वितीय राठोड नेहा एकनाथ तर तृतीय क्रमांक राठोड कार्तिक विनायक यांना देण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. प्रत्येक शिक्षकांच्या डोळ्यात अश्रु होते. तर विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी जपत भावूकपणे निरोप घेतला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संतोष चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्यासाठी सुसंस्कार व शिक्षणाचे महत्व पटवून दिले. दहावी, बारावी विद्यार्थ्यांनी शाळेला एक संगणक संच भेट दिला.

या कार्यक्रमाला अभिजीत चव्हाण, किरण ढोले , बाळासाहेब मुखम, आप्पासाहेब साबळे , खंडेराव कारले,किरण कांबळे, बालाजी राठोड, दुर्गेश कदम, श्रीमती लवंद कल्पना, कुंचगे प्रमिला, अश्विनी लबडे, कु. मयुरी कांबळे, सागर चव्हाण अमितसिंह खारे, शंकरराव चव्हाण, सुग्रीव देवकते, किसन पांचाळ, बालाजी अहंकारे, सिद्राम बनसोडे , श्रीमती बेबाबाई बुरुड, श्रीमती सुरताबाई चव्हाण उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या