spot_img
spot_img
spot_img

धाराशिव जिल्ह्याचे सीईओ साहेब व शिक्षणाधिकारी साहेब यांची संभाजीनगर जळकोट शाळेस अचानक भेट 

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर जळकोट येथे धाराशिव जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मैनाक घोष साहेब व धाराशिव जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीयुत नागेश मापारी साहेब यांनी अचानक भेट देऊन शालेय परिसराची व गुणवत्तेची पाहणी केली. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी शिक्षणाधिकारी यांच्या समवेत असलेल्या पथकासह भेट देत शालेय गुणवत्तेची तपासणी केली. कोणत्याही प्रशासकीय कागदपत्राची पाहणी ऐवजी विद्यार्थ्यांना भेट देत त्यांच्याशी मुक्त संवाद साधला. विद्यार्थ्यांही साहेबांशी संवाद करताना आनंदून गेले. गुणवत्ता समाधानकारक असल्याचे सांगत शाळेस भेट दिल्याचे आनंद झाल्याचे साहेबांनी नमूद केले. यावेळी मा. शिक्षण अधिकारी साहेबांनी शालेय पोषण आहाराची तपासणी करून समाधान व्यक्त केले. इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यानी ceo साहेबांचे मन जिंकले. साहेबांनी पहिलीच्या चिमुकल्याना अक्षराश कडेवर उचलून घेत शाबासकीची थाप दिली. एकूणच शालेय परिसर व गुणवत्ता पाहून साहेबांनी आनंद व समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार यांच्या शुभहस्ते सी ओ साहेब व मापारी साहेब यांचे शाळेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले. तसेच शालेय भौतिक गरजाविषयी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या