प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष घनकचरा टेंडर रद्द करा काँग्रेस नगरसेवकांचे सर्वसाधारण सभे अगोदर अंदोलन
नळदुर्ग.दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले असून येत आहे सदरील योजना हे फक्त गुत्तेदार जगविण्यासाठी आहे का ? हाजरी दाखवा पैसे घ्या याला जबाबदार कोण ? म्हणत काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी घनाघात करत सत्ताधाऱ्याला वेटीस धरले घनकचरा व्यवस्थापन समितीकडे नळदुर्ग नगर प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे या विषयाला अनुसरून वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा संबंधित नळदुर्ग नगरीचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष बसवराज धरणे व नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी हा महत्त्वाचा विषय लक्षात न घेता त्यानी चक्क या विषयाकडे कानाडोळा केला

नळदुर्ग शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याचा महत्वाचा विषय असताना वेळेत निवेदन देऊन सुद्धा संबंधिताने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून हे आम्हाला नगरपालिकेच्या समोर साधारण सभेच्या अगोदर आंदोलन करावी लागते आहे हे प्रशासनाला दाखवून दिले पाहिजे नळदृश्यरात होत असलेली घनकचरा व्यवस्थापनाची भ्रष्टाचारी हे मुक्त झाली पाहिजे हा हेतू लक्षात घेऊन नळदुर्ग शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकाने हातात फलक घेऊन हे घनकचरा व्यवस्थापन टेंडर रद्द करण्याची मागणी या ठिकाणी केली आहे यावेळी नळदुर्ग शहरातल्या अनेक विषयावरती अनेक विकास कामे संदर्भात महत्वपूर्ण चर्चा केली परंतु राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या निवेदनाला प्रशासनाकडून व नगराध्यक्ष यांच्या कडून केराची टोपली मिळाली आहे
नळदुर्ग शहरात पसरलेला घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने सदरील घनकचरा व्यवस्थापन समितीतील सर्व सफाई कामगार आसुन आडथाळ नसुन खोळंबा या म्हणी प्रमाणे कर्मचारी कामे करतात
कागदावर मजुराची टिप्पणी करून पैसे हाडप करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी व त्याचे टेंडर रद्द करावे
शहरातील खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे आर ओ प्लॅन बसवुन ४ वर्ष झाले ते आज ही धुळखात पडुन आहे
नळदुर्ग शहरामध्ये जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे खरंतर घनकचरा व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्याने चिकाटीने काम करायला हवे होते परंतु फक्त गुत्तेदाराची पैसे उचलण्यामध्ये चिकाटी असल्याने हे स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे
दिवाबत्ती लावा आणि अंधार दूर करा घनकचरा टेंडर रद्द करा आशा गगणभेदी घोषणा देत केले अंदोलोन यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते मारुती खारवे , उपनेते आकाश कुलकर्णी , नगरसेवक इमाम शेख , नगरसेवक सुधीर पोतदार , नगरसेविका अपर्णाताई बेडगे , नगरसेवक गफूर कुरेशी , नगरसेविका मुन्नाबी कुरेशी , नगरसेविका कमलताई गायकवाड आदी नगरसेवकाने आंदोलन केले आंदोलना नंतर सर्वसाधारण सभेसाठी हजर झाले






