नळदुर्ग शहरातील शहराची प्रेरणा ठरलेल्या हुतात्मा स्मारकाचे प्रशासनाने व नागरिकांनी पावित्र्य जपावे :- गटनेते मारुती खारवे
———————————————
नळदुर्ग .दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहराला खुप मोठा इतिहास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन चळवळीत हुतात्मा बाबुराव बोरगावकर व निलय्या स्वामी यांचे योगदान व्यर्थ जाऊ देऊ नये आपणासाठी खुप मोठी प्रेरणा आहे किल्ल्याच्या गेटवर जुलमी रजाकारानी हुताम्याच्या छातीवर गोळ्या झाडल्या खुप मोठे बलीदान हुतात्म्यांनी दिले आहे त्यांचे विचार आपल्यासाठी खुप मोठी प्रेरणा आहेत .
जर वर्षा प्रमाणे या ही वर्षी आपण प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांची आठवण करतोय त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली यावेळी नळदुर्ग शहरातल्या ऐतिहासिक दृष्ट्या नळदुर्ग शहराच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये जे प्राणाची आहुती देऊन जे बलिदान दिले बलिदान देणाऱ्या वीर हुतात्म्यांना आदरांजली वाहत असताना नळदुर्ग येथील हुतात्मा स्मारकाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्मारका मध्ये अस्वच्छता दिसून आली आसताना देश भक्त आणि एकतेचा संदेश देत त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावत आसताना दि २२ फेब्रुवारी १९४७ या दिवशी जुल्मी व अन्याय कारक रजाकारानी ऐतिहासिक किल्याच्या गेटवर हुतात्मा बाबुराव बोरगावकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांची निर्घुण हत्त्या करण्यात आली इतिहासातील आज सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो आपण इतिहास जपायला हवा असे परखड मत नळदुर्ग नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी केले .
नळदुर्ग शहराचा इतिहास म्हणजे आपल्या साठी प्रेरणा देणारा आहे नळदुर्गकरांनी हे हुतात्मा स्मारक आपल्यासाठी संजीवनी आहे हे विसरू नये स्मारकातील उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठीचे पाऊल उचलणार आहोत या पवित्र हुतात्मा स्मारकाचे पावित्र प्रशासनाने आणि नागरीकांनी ही जपावे आहे आसे परखड मत नगर परिषदेचे गटनेते मारुती खारवे यांनी केले
नळदुर्ग येथे ज्या हुतात्म्याने बलिदान दिले होते त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करत जे हुतात्मा स्मारकांमधील अर्धवट जे काम राहिलेले आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी हुतात्मा स्मारक विकसीत करण्यासाठी कटीबद्ध राहाणार आहोत आसे ही नगराध्यक्ष बसवराज धरणे बोलत होते
यावेळी माजी नगरसेवक विनायक अहंकारी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद नाईक,जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे , पाणी पुरवठा सभापती तानाजी जाधव , बांधकाम सभापती शशिकांत पुदाले , भाजपाचे नेते सुशांतजी भूमकर सामाजिक कार्यकर्ते संजय बताले नळदुर्ग नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर त्यांचे सर्व कर्मचारी हुतात्मा पुत्र स्वामी माजी नगरसेवक सुधीर हजारे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे , सामाजिक कार्यकर्त्या सुभद्राताई मुळे , उबाठाचे नेते कमलाकर चव्हाण , सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे , नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , पत्रकार उत्तम बनजगोळे , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव बलदेव ठाकूर , दयानंद स्वामी , विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले भाजपाचे भिमाजी घुगे भाजपाचे नेते दत्तात्रय कोरे सामाजिक कार्यकर्ते सुभाष कोरे पत्रकार दादासाहेब बनसोडे सह नळदुर्ग शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमतः नळदुर्गच्या ऐतिहासिक चावडी चौकामध्ये होतात त्यांचे पूजन करण्यात आले त्यानंतर ज्या हुतात्म्याचे स्मारकामध्ये हुतात्म्यांच्या फोटोचे पुजन करून मानवंदना देण्यात आली व त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी नळदुर्ग शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते






