spot_img
spot_img
spot_img

शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी दिली जलशुद्धीकरण केंद्रास भेट

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट 

दिनांक 20 फेब्रुवारी, 2026 रोजी, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथील डिप्लोमा फर्स्ट इयर व सेकंड ईयर इलेक्ट्रिकल विभागातील 120 विद्यार्थ्यांनी सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत ब्रिटिश काळातील स्थापना सन 1932 मधील भवानी पेठ मधील जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिली. खूप चांगल्या पद्धतीने आजतागायत हे जलशुद्धीकरण केंद्र भवानी पेठ येथे सुरू आहे. पाणी शुद्धीकरण प्रत्येक प्रोसेसची माहिती येथील कनिष्ठ अभियंता श्री. वाघमारे व पाणी व्यवस्थापना इन्स्पेक्टर विकास रेड्डी यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेतील सार्वजनिक पाणीपुरवठा अभियंता श्री. चौबे व श्री. आंबेघर यांनी या शैक्षणिक उपक्रमास प्राधान्याने मान्यता दिली.

शैक्षणिक सहलीचे आयोजन प्रा. गायकवाड सारिका आणि प्रा. प्राची शीरसीकर यांनी केले. प्राचार्य डॉ. संदिपान नरोटे, विभाग प्रमुख श्री. तपकिरे व श्री. भद्रे यांनी संस्थेतर्फे सोलापूर महानगरपालिकेचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या