spot_img
spot_img
spot_img

टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क

भारतीय बाजारपेठेतील मारुती सुझुकीच्या वर्चस्वाचा अंदाज तुम्हाला यावरून येऊ शकतो की, ही कंपनी ह्युंदाई मोटार, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या आघाडीच्या चार कंपन्यांपेक्षाही जास्त कार विकते. या वर्षीच्या जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या आकडेवारीवरून मारुती सुझुकीच्यापेक्षा इतर सर्व कंपन्या गाड्या विक्रीच्या बाबतीत मागे असल्याचे सिद्ध होत आहे.

यावर्षी टॉप चार कंपन्यांनी किती गाड्या विकल्या?

२०२४ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत एकट्या मारुती सुझुकीने १.६३ दशलक्ष कार विकल्या. यानंतर Hyundai Motor India दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने एकूण ५,६३,२२५ कार विकल्या; तर यावर्षी तिसऱ्या स्थानावर टाटा मोटर्स आहे, जिने एकूण ५,१८,२५२ कार विकल्या. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने चौथे स्थान मिळवले आणि यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत एकूण ४,८७,०३६ कार विकल्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ह्युंदाई, टाटा आणि महिंद्राची संख्या एकट्या मारुती सुझुकीपेक्षा ६० हजार युनिट्स कमी आहे.

Related Articles

ताज्या बातम्या