spot_img
spot_img
spot_img

संस्कार भारतीच्या प्रांत कार्यकारिणीवर पद्माकर मोकाशे यांची निवड

 

अणदूर संपादक: संस्कार भारती देवगिरी प्रांत प्रदेश कार्यकारणीवर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील पद्माकर मोकाशे यांचे छायाचित्र प्रदेश सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.यानिमित्त येथील निवासस्थानी गुरव समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथील लालबहादूर शास्त्री सभागृहात देवगिरी प्रांत संस्कार भारतीची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी प्रांतीच्या अध्यक्षा प्रा स्नेहाताई पाठक,प्रांत महामंत्री डॉ जगदीश देशमुख यांच्यासह मराठवाडा आणि खानदेश मधील सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्तम छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले पद्माकर मोकाशे यांची यावेळी निवड करण्यात आली असून ग्रामीण भागात उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले पद्माकर मोकाशे यांचा सत्कार अणदूर येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित समाज बांधव
प्रकाश वंसंतराव मोकाशे, राम बाबुराव मोकाशे,सागर तुकाराम मोकाशे, विशाल प्रकाश मोकाशे,गजानन रमेश मोकाशे,विवेक संजय मोकाशे,अक्षय सुरेश मोकाशे,अंकुश सुभाष मोकाशे,पुरुषोत्तम सुरकवंत ढेपे, प्रसाद मनोज स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Related Articles

ताज्या बातम्या