वागदरी(एस.के.गायकवाड): तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते वागदरी,येडोळा,गुजनूर, शहापूर,गुळहळ्ळी मार्गे अक्कलकोट जाणारा नव्याने मंजूर झालेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ चे सिमेंट रोडचे काम गेल्या सहा वर्षांपासून जगोजागी प्रलंबित आहे.ते प्रलंबीत काम त्वरितपूर्ण करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करावी या मागणीचे लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशि जिल्हा समन्वयक तथा जिल्हा सचिव एस.के.गायकवाड सह ग्रामस्थांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर येथे आयोजित आम सभेत जणता दरबार प्रसंगी दिले.
विधानसभा-२०२४ निवडणुकी नंतर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमातून विजयी झालेले भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात पहिल्यांदाच आमसभेचे आयोजन केले होते.या प्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा समन्वयक तथा पत्रकार एस.के.गायकवाड , यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील उर्फ राणा दादा यांना सदर मागणी चे निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, नळदुर्ग ते अक्कलकोट या राष्ट्रीय महामार्गचे काम शेतकरी,शासन, प्रशासन, गुत्तेदार व न्यायालय यांच्या चक्रव्यूहात आडकले असून गेल्या सहा वर्षांपासून जागोजागी शेतकऱ्यांनी आडविल्याने अर्धवट अवस्थेत रखडले आहे.ज्याठिकाणी काम रखडले आहे त्या ठिकाणी रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून दगडही उघडे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून वहान चालवणे मोठे जोखमीचे झाले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.वारंवार या बाबत जनतेनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन विधानसभा निवडणुक-२०२४ च्या प्रचारार्थ नळदुर्ग येथे आयोजित प्रचार सभेत देशाचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी या रोडचे प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी ६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल असे सांगितले होते.परंतू अद्याप या कामाला सुरुवात झाली नाही.तरी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या कामी योग्य तो पाठ पुरावा करून या रोडचे प्रलंबित काम त्वरित पूर्ण करून या रोडवरील वहातूकव्यवस्थ सुरळीत करावी असी मागणी केली आहे.या प्रसंगी भाजपा मेडियासेलचे तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ, सरपंच फुलचंद वाघमारे, लहुजी शक्ती सेनेचे महादेव मोरे सह वागदरी, येडोळा,गुजनूर, शहापूर, गुळहळ्ळी,दहीटणा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.