spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष पदी विलास राठोड

 

विजय पिसे (जळकोट) :- तुळजापूर तालुक्यातीत जळकोट येथून जवळच असलेल्या अलियाबाद येथील संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेचे जिल्हा आ.सदस्य, भाजपचे तालुका सरचिटणीस विलास राठोड यांची जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष पदी रामतीर्थ चे माजी सरपंच दामाजी राठोड यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी जळकोटवाडीचे मा.सरपंच वसंत पवार यांची नुकतेच गोर धर्मपीठ लोधीवली, मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषद अधिवेशनाच्या कार्यक्रमात पोहरदेविचे धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज,धर्मनेता मा.किसनभाऊ राठोड,राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ राठोड, प्रदेशाध्यक्ष मा.भिकनभाऊ जाधव ,मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे राज्याचे प्रमुख मा. रामेश्वर भाऊ नाईक व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले

विलास राठोड यांचे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहून त्यांची संघटनात्मक काम करण्याची जबाबदारी देण्यात आली.लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून सामाजिक जनहित जोपासून संघटनेचे नाव उज्वल कराल ही अपेक्षातसेच गोरबंजारा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक धार्मिक आर्थिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहून राष्ट्रीय बंजारा परिषद ही संघटना मजबूत करावी असा असा मजकूर राष्ट्रीय बंजारा परिषद यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे .या निवडी बद्दल जळकोट येथे भाजपा तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे,जिल्हा सरचिटणीस दीपक दादा आलुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशिष सोनटक्के जि प सदस्य गणेश सोनटक्के, प्रदेश का. सदस्य प्रभाकर मुळे या मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा मानाचा फेटा शॉल हार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी संजय माने ,अप्पू किलजे ,अनिल भाऊ बेडगे,मनोज चव्हाण सह बहुसंख्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .

Related Articles

ताज्या बातम्या