नळदुर्ग: वसतिगृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी त्रस्त

नळदुर्ग येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील अधिकारी व कर्मचारी याच्या मनमानी कारभारा मुळे विद्यार्थीअनेक सुविधा पासून वचित : वरिष्ठाधिकारी यानी लक्ष देण्याची मागणी

0
52

जळकोट (अरुण लोखंडे ): डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह (मुलांचे)नळदुर्ग ता. तुळजापूर येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी त्रस्त झाले असून अनेक सुविधा पासून वंचित आहेत.

या बाबत मिळालेली माहीती असी की शासनाने ग्रामीण भागातील गरीब मागासवर्गीय विद्यार्थाना शिक्षणा बरोबरच राहण्याची भोजनाची सोय व्हावी शिक्षणासाठी लागणारे शैक्षणीक साहित्य त्यांना मिळले पाहिजे एकंदरीत मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहू नये या उदात्य हेतूने महाराष्ट्र शासनाने नळदुर्ग ता. तुळजापूर या ठिकाणी सर्व सुविधानिशी शासकीय वसतिगृह सुरू केले असून या वसतीगृहा मध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी राहतात. परंतू या वसतीगृहातील शासकीय कर्मचारी व अधिकरी यांचा येथे मनमानी कारभार चालतो असे समजते. विद्यार्थ्यांना मिळाणाऱ्या मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत.

विद्यार्थ्याना अभ्यासायाठी दिलेले फलक किंवा अन्य शैक्षणीक साहित्य दिले जात नाही, विद्यार्थाना क्रीडा साहीत्य पुरविले जात नाही. विद्यार्थ्यासाठी देण्यात येणाऱ्या भोजना मध्ये कूचराई केली जाते, ज्या दिवसी मांसाहारी जेवन असेल त्या दिवसी असशाकीय कर्मचाऱ्याना शामिल करणे बाहेर डबे देणे, असा प्रकार चालतो. स्वयपाक खोलीतील सी सी टिव्ही कॅमेरा जाणीव पूर्वक बंद ठेवण्यात आला आहे. शासनाने दिलेले साहित्य बंद खोलीत टाळा मारून ठेवण्यात आले आहे. तसेच वसतीगृहाच्या काही खोल्याच्या खिडकीच्या काचा तुटलेल्या आहेत याकडे कर्मचारी दुर्लक्ष करतात, काही कारणास्तव वसतीगृहातील विद्यार्थी एखादया दिवसी गैहजरअसेल किंवा गैरसोयी बाबात विचारणा केली तर त्याला वसतीगृहातून काढून टाण्याची धमकी दिली जाते. एकंदरीत येथील कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथिल विद्यार्थी त्रस्त झाले असून त्याना तोंड दाबून बुक्कीचा मार सहन करावा लागत आहे.

तरी मा.जिल्हाधिकारी साहेबानी वेळीच लक्ष देवून येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दुर करावी असी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here