spot_img
spot_img
spot_img

जिल्हा परिषद नंदगाव शाळेत बाल आनंद मेळावा मोठया उत्साहात साजरा

नंदगाव (शाम नागिले )तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा ठेवण्यात आला होता त्यात शिक्षक व पालकांनी सहभाग घेत या बाल मेळाव्याचा आनंद घेतला

या बाबत सविस्तर व्रत असे की,लहान वयात मुलांना योग्य संस्कार आणि शिकवण मिळाली पाहिजे व शिक्षणा सोबत व्यवसाय अनुभव आला पाहिजे हा उदात्त हेतु ठेवत तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे आज दिनांक 25/01/2025 रोजी जिल्हा परिषद प्रशाला शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता , या वेळी गावातील ग्रामस्थांनी व पालकांनी बाल आनंद मेळाव्या मध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे साहित्य व खाऊ खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले .या वेळी या लहान मुलांनी अनेक प्रकारचे पुस्तकाचे स्टॉल ,खाऊ ,पाणी पुरी,कोबी मंचुरण ,गुलाब जामून, भेळ, सुरकुंबा असे अनेक प्रकारचे पदार्थ या स्टॉल वर ठेवण्यात आले होते .या वेळी बरीचसी खरेदी विक्री झाल्याने लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता, हा बाल आनंद मेळावा चांगल्या पद्धतीने पार पडावा या साठी मुख्याध्यापक पी.आर.वाकडे, जी.बी.खंदारे, एम.टी.धोत्रे, एम.के.कुंभार, एच.जी.उपासे, आर.एस. वायकर, डी.डी.कदम, टी.डी. पंडित, लिपिक एन.एच. सगर, शिक्षिका श्रीमती एस.डी.आडे,श्रीमती ए.एस. आवटे , श्रीमती डी.जे.मंडले, राठोड सर,तसेच शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सतीश बशेट्टी, रोहिदास कांबळे व शिपाई जमादार बाई आदींनी मोठे परिश्रम घेतले .

Related Articles

ताज्या बातम्या