spot_img
spot_img
spot_img

समर्थने समतेचे दर्शन घडवले: मंगेश चिवटे

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

जळकोट व परिसरातील सर्व जाती-धर्मातील व्यक्तींचा सन्मान करून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे समर्थ क्लासेस व समर्थ बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेने समतेचे दर्शन घडवले. असे गौरवउद्गार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी कक्ष प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी जळकोट येथे काढले.

जळकोट येथील यशाची उज्वल परंपरा असलेल्या समर्थ क्लासेस व समर्थ बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने जळकोट व परिसरातील उद्योजक, व्यापारी, शिक्षक, पत्रकार, शेतकरी आदि क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंगेश चिवटे हे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत स्वामी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गजेंद्र कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के , युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुरज जम्मा आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचा समर्थ क्लासेसचे संचालक व समर्थ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामशेट्टी पाटील यांनी सत्कार केला.

समर्थ क्लासेस व संस्थेच्यावतीने जळकोट व परिसरातील उद्योग ,व्यापार, शिक्षक, पत्रकार, शेतकरी , राजकीय, सामाजिक क्षेत्रातील जवळपास १०० मान्यवरांचा शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात रामशेट्टी पाटील यांनी समर्थ संस्थेच्या माध्यमातून जळकोट व परिसरात सामाजिक कार्य करत आहे. आतापर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत. यापुढेही छोट्या छोट्या उपक्रमातून संस्थेच्या माध्यमातून काम करत राहू. मंगेश चिवटे यांचा केदारलिंग देवस्थान ट्रस्टच्यावतीने बाबुराव पटणे, भीमाशंकर नळगे, सदाशिव हासुरे, विजय पिसे यांनी तर जळकोट ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने सरपंच गजेंद्र कदम यांनी सिद्धरामेश्वरांच्या नंदीकोलची प्रतिकृती देऊन सत्कार केला.

मंगेश चिवटे पुढे म्हणाले की, रामशेट्टी पाटील यांनी सामाजिक कार्यातून एकतेचे दर्शन घडवले आहेत. त्यांना सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष प्रमुख असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावागावात कोट्यावधी रुपयेचा निधी आपण मंजूर करून दिला. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. विविध आजारावर आपण हा निधी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज किलजे यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या