spot_img
spot_img
spot_img

प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणा सोबत खेळाच्या माध्यमातून देखिल आपले कौशल्य दाखवावे -: सतीश सूर्यवंशी

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

धाराशिव येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या वितरण सोहळ्यात “प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणा सोबत खेळाच्या माध्यमातून देखिल आपले कौशल्य दाखवावे”असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन चे संचालक सतीश सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

कौशल्य विकास, रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संकल्पनेतून प्रशिक्षण सोबत प्रशिक्षणार्थी यांच्या कलागुणांना वाव मिळून त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण व्हावी याकरीता महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दिनांक २३व २४ रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक २४ रोजी सायंकाळी सात वाजता धाराशिव येथील भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ठेवण्यात आले होता. या जिल्हास्तरीयत क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी सहभाग नोंदविला होता.

या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, खो-खो ,हॉलीबॉल 100 मीटर ,रनिंग 200 मीटर रनिंग ,कॅरम, बुद्धिबळ अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये मुलींनी देखील स्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता.

या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे प्रमुख अतिथी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण चे संचालक सतीश सूर्यवंशी, ,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी धाराशिव प्रवीण औताडे , शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव डॉ सचिन टिके, सचिन लोणारे , एसबीआय धाराशिव सुलतान सर सिविल हॉस्पिटल धाराशिव,डॉ. सायली जैन हे होते.

या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत खो खो खेळात भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव प्रथम तर द्वितीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुळजापूर, क्रिकेट खेळात संत श्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव , हॉलिबॉल मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव प्रथम तर द्वितीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरगा , कॅरम मध्ये प्रथम धाराशिव तर द्वितीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब,

बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम धाराशिव तर द्वितीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भूम, १००मीटर व २००मीटर धावणे स्पर्धेत धाराशिव आणि कळंब येथील संत श्रेष्ठ गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था च्या प्रशिक्षणार्थी यांनी क्रमांक पटकावला. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .यातून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना पुढे विभागीय स्पर्धेस पाठविण्यात येणार आहे.

पुढे बोलताना प्रमुख अतिथी संचालक सतीश सूर्यवंशी” यांनी प्रशिक्षणासोबत शरीर स्वस्थ देखिल तितकेच महत्त्वाचे आहे. खेळ म्हणजे प्रशिक्षणार्थी आणि शिल्प निदेशक यांच्यातील दुवा आहे असे त्यांनी सांगितले.’

चौकट…… या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत १०८रुग्णवाहिकेची देखील महत्वाची मदत मिळाली.१०८ रुग्णवाहिकेचे डॉ. सायली जैन आणि चालक शरद घोडके व देडे यांनी खेळाडूंना प्राथमिक उपचाराच्या माध्यमातून मोलाची मदत केली.

चौकट….. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण नंतर भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील दोन स्मार्ट क्लासरूम चे उद्घाटन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण चे संचालक सतीश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी संस्थेतील विविध उपक्रमंची महिती घेवून कर्मचारी यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे यांनी केले सुत्रसंचलन शिल्प निदेशक मनोज चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य हर्षद राजूरकर यांनी केले. सदरील दोन दिवशीय जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य श्री संतोष कांबळे, श्री मारुती बिरादार ,श्री केशव पवार, श्री संतोष कदम, श्री संजय माळकुंजे, सर्व गटनिदेशक, शिल्प निदेशक, कार्यालयीन कर्मचारी , भंडार विभागातील कर्मचारी,चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले याप्रसंगी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या