सोलापूर प्रतिनिधी :- भारतातील सर्वसामान्य प्रजेच्या हाती सत्ता देणारा आजचा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरलेला आहे.यानिमित्त देशाच्या प्रजासत्ताक दिनाचा समारंभ आज सर्वत्र साजरा झाला.
भाजपा सोलापूर शहर कार्यालय येथे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले तसेच सामूहिक राष्ट्रगीतानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले सार्वभौम आणि लोकशाही गणराज्य असलेल्या आपल्या महान भारत देशाचा आज ७६वा प्रजासत्ताक दिन आहे. प्रत्येक भारतीयाने या महत्त्वपूर्ण दिवशी देशहितकारक कार्य करण्याची आणि आपल्या लोकशाहीची अखंडता कायम ठेवण्याची प्रतीज्ञा केली पाहिजे. सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
याप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक बंधू, भगिनी उपस्थित होते.