spot_img
spot_img
spot_img

जि.प. प्रशाला जळकोट व ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. त्यादिवशी आपली राज्यघटना लागू झाली आणि हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक घेऊन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो याच दिवशी जि.प. प्रशाला व ग्रामपंचायत जळकोट येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले .त्यानंतर जि. प. प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. व प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, वंदे मातरम वंदे मातरम च्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी ढोल ताशाच्या आवाजामध्ये गावातून वाजत गाजत ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन तेथील कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला या कार्यक्रमांमध्ये जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला व तसेच जिल्हा प्राथमिक कन्या प्रशाला व , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर येथील सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत येथे येऊन सहभाग नोंदवला त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीस जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम व ग्रामपंचायत सदस्या यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्यानंतर जळकोट गावचे प्रथम नागरिक सरपंच गजेंद्र कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारत माता की जय “वंदे मातरम” च्या घोषणा देत झेंड्याला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यानंतर गावातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी वेगवेगळे पोशाख परिधान करून देशभक्तीपर गाण्यावरती आपले आपले नृत्य सादर केले .यामध्ये लहान चिमुकल्यांचा ही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यानंतर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालय तर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमास गावचे सरपंच गजेंद्र कदम, माजी सरपंच अशोक भाऊ कदम, ग्रामसेवक देवानंद रेड्डी, व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व माजी सैनिक सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग, सर्व शाळेचे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी ,गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव, अंगणवाडी सेविका व तसेच पालक वर्ग व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या