नंदगाव (शाम नागिले ):
पंजाब राज्यातील अमृतसर येथील मुख्य चौकात असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर चढून हातोडीने पुतळ्याची तोड फोड करून व पुतळ्याच्या चंबुत्यावर आग लावून एका जातीवादी माथेफिरूने डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनीची विटंबना केली असून सदर निंदनीय घटनेचा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे दलित पँथर धाराशिव जिल्हा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) च्या वतीने तिव्र जाहीर निषेध करण्यात आला असून आरोपी मातेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखलं करण्याची मागणी करण्यात करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर व्रत असे की,रिपाइं(आठवले ) नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने व भारतील दलित पँथरच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाणे चे पोलीस निरिक्षक गजेंद्र सरोदे यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की दि.२६ जानेवारी २०२५ रोजी संबंध देशभर प्रजासत्ताक दिनाचा अमृत मोहत्सवी वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरा करत असताना पंजाब राज्यातील अमृतसर येथे मात्र एका मनुवादी जातीयवादी माथेफिरूनी भारतीय संविधानाचे शिल्पकार लोकशाहीचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली. ही घटना अतंत्य निंदनिय असून या घटने चा जाहीर तिव्र निषेध करण्यात येत असून आरोपी माथेफिरुवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात
येत आहे.
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे धाराशिव जिल्ह समन्वयक एस.के. गायकवाड,पत्रकार अरुण लोखंडे, रिपाइं (आठवले) चे नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे,दलित पॅथरचे जिल्हा संपर्क प्रमुख शामकांत नागीले,. जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी,देवानंद बनसोडे रिपाइं तालूक संघटक सुरेश लोंढे, आरविंद लोखंडे, डीबीएन संस्थेचे तालूका अध्यक्ष उमेश गायकवाड, आदींच्या सह्या आहेत.