आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट….. कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य आयोजित माँ तुझे सलाम कर्तव्य संमेलनात समाज, संस्कृतीचे संरक्षण व लोकशाही विचारांना एकत्र आणण्यासाठी आणि जगण्याचे चांगले ध्येय बनवणाऱ्या अशा ऐतिहासिक गुणवत्तेच्या सर्वश्रेष्ठ सन्मान सोहळ्यात अणदूर येथील जवाहर महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख प्रा. डॉ. सत्येंद्र राऊत यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री मा. नयना आपटे, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे संचालक मा. लायन डॉ. प्रशांत सर, महाराष्ट्र शासन युवक पुरस्कार विजेते तसेच कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समितीचे संस्थापक प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्या शुभ हस्ते
पालघर येथे साहित्य निर्माता राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा.डॉ. सत्येंद्र राऊत यांची संपादित पाच पुस्तके डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संस्कृतच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून चार प्रातिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशित झालेली आहेत यापैकी प्रेम काव्यसंग्रहाची ओ एम जी या जागतिक रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झालेली आहे. अशा प्रकारच्या विविध साहित्यनिर्मितीमुळे साहित्य निर्माता राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव मा. रामचंद्रदादा आलुरे, मार्गदर्शक मा. विक्रम आलुरे, प्राचार्य उमाकांत चनशेट्टी व उपप्राचार्य डॉ. मल्लीनाथ लंगडे आणि विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. अंकुश कदम सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रा. राऊत सरांचे अभिनंदन केले.