spot_img
spot_img
spot_img

नंदगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी.नंदगाव (शाम नागिले)

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करत, दीपप्रज्वलन विरक्त मठाचे मटाधिपती म. नी. प्र.राजशेखर महास्वामीजी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या बाबत सविस्तर व्रत असे की सालाबादा प्रमाणे याही वर्षी तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा घेण्यात आला .या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी विरक्त मठाचे मटाधिपती म. नी. प्र.राजशेखर महास्वामीजी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील आजी माजी सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक व युवा कार्यकर्ते उपस्थित होते . सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्राथमिकच्या चिमुकल्यांच्या डान्सवरती श्रोत्यांनी ठेका धरून कौतुक केले. यावेळी महाराष्ट्रातील विविध लोककलासह देशभक्ति पर गीते ,कन्नड, तेलगू व मराठी गीतांवर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरण केले. या वेळी मुख्याध्यापक प्रभाकर राठोड सर म्हणाले की, लहान वयात मुलांना योग्य संस्कार आणि शिकवण मिळाली पाहिजे व शिक्षणा सोबत नृत्य कलेचा अनुभव आला पाहिजे व शालेय उपक्रमांमधील सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. 

 या कार्यक्रमासाच्या यशस्वीतेसाठी नदाफ सर , कोळी सर, जाधव मॅडम, पोळे मॅडम, राठोड मॅडम, अमोल सुरवसे, संभाजी माने ,शालेय समिति अध्यक्ष सागर पाटील व परमेश्वर कोरे आदींनी परिश्रम घेतले. पालक आणि शिक्षक यांनी विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक करून उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या कलाकारांना बिस्किटे व रोख रक्कम असे बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमाचा गावातील नागरिकांनी ,विद्यार्थी व पालकांनी आनंद लुटला.

Related Articles

ताज्या बातम्या