- नंदगाव प्रतिनिधी (शाम नागिले ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती व युगपुरुष तरुण मंडळाच्या वतीने माहामाता त्यागमुर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती मोठया उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन ग्रामपंचायत माजी सदस्य दामु लोखंडे, सुरेश लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . त्यानंतर माहामाता त्यागमुर्ती बाबासाहेबाची सावली रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन शालेय विद्यार्थीनी आसावरी लोखंडे व अर्पिता लोखंडे यांच्या शुभ हस्ते अगरबत्ती मेणबती प्रज्वलीत करुण पुष्पहार अर्पण करण्यात आले . त्यानंतर सामुहीक त्रिशरण पंचशिल घेण्यात आले . त्यानंतर समितीच्या वतीने ग्रामपंचायतचे .कर्मचारी अर्जुन सावंत यांच्या जन्मदिवासा निमीत्ताने पत्रकार अरुण लोखंडे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला . यावेळी . प्रकाश लोखंडे, अरविंद लोखंडे, विशाल माने,देवयानी लोखंडे,अदीती माने, आरती लोखंडे,अनुष्का लोखंडे, आदिती गायकवाड,स्नेहा माने, सलोनी माने,सोनाली माने,प्रगती साखरे सह भिमनगरमधील बौद्ध उपासक उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सतिश माने यांनी मानले .