सोलापूर प्रतिनिधी . ( मलसिद्ध रोकडे )
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आले , मिरवणुकीमध्ये विविध मंडळ सहभागी होते,
यात माता रमाई .व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आधारित विविध असे ढेकावे सादर करण्यात आले होते. यात संतोष बहुउद्देशीय सामाजिक संस्था . भिमाई प्रतिष्ठान , त्या मूर्ती प्रतिष्ठान न्यू बुधवार पेठ सोलापूर, सम्राट युथ फाऊंडेशन, माता रमाई प्रतिष्ठान, सम्राट अशोक प्रतिष्ठान, प्रबुद्ध राष्ट्र प्रतिष्ठान, रमाई युथ फाउंडेशन व माता रमाई सामाजिक संस्था यांच्यावतीने , आकर्षक असे सुंदर देखावे साकारण्यात आले होते,