spot_img
spot_img
spot_img

एक जुटीची ताकद पहिल्याच आंदोलनात यश त्याच जागेत संविधान भवन होणार जिल्हाधिकाऱ्याची घोषणा

पुणे जिल्हा प्रतिनिधी (अजिंक्य मस्के) त्यागमूर्ती, महामाता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय यशवंत भाऊ नडगम यांनी १२७ किलोचा भव्य पुष्पहार अर्पण करून माता रमाई अभिवादन केले व त्या नंतर*

 

*डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सांस्कृतिक भवनाचे जागा साठी आंदोलनात सुरुवात करण्यात आली.* *याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.७/२/२०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती,पुणे शहर च्या वतीने भवनाच्या बाजूची २ एकर ९ गुंठे जमीन ही सन १९९२ साली पुणे मनपा ने भवनाच्या विस्तारीकरणा साठी ठराव करून राखीव ठेवली असताना,प्रशासनाच्या भोंगळ व भ्रष्टाचारी गलथान कारभारांमुळे ही जागा एका खाजगी बिल्डरला करारावर देण्याचा कट रचल्याने व ही जागा त्याच्या घशात घालण्याचा डाव उधळून टाकून पुन्हा आपली जागा ही स्मारकासाठी मिळण्यासाठी पुणे शहरातील सर्व भीम सैनिकांच्या वतीने आज माल धक्का चौक मंगळवार पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांना या विषयात शिष्टमंडळाने निवेदन दिले यानंतर लगेचच जिल्हाधिकारी साहेबांनी इनकॅमेरा असे आश्वासित केले की सदरील जागेवर “संविधान भवनच “बांधले जाईल,त्या बाबतचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठवत आहे.हे आंदोलन व हा बाबासाहेबांच्या अस्मितेचा लढा आपण सर्वांनी यशस्वी पार केल्याने सर्व भिमसैनिकांचे व संविधान प्रेमींचे दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भाऊ नडगम यांनी मनापासून आभार मानले ….!!*

Related Articles

ताज्या बातम्या