spot_img
spot_img
spot_img

अणदूर येथे ऑटो गॅरेजला संशयास्पद आग | कटकारस्थान की अपघात

मौजे अणदूर येथे काल (दि. ८ फेब्रुवारी) रात्री बारा ते एकच्या सुमारास श्री. स्वामी समर्थ ऑटो गॅरेज सर्विस सेंटर व स्पेअर पार्ट स्टोअर या दुकानाला अचानक आग लागली. ही आग कोणीतरी जाणून-बुजून लावली की शॉर्टसर्किटमुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले दुकान अचानक आगीच्या विळख्यात सापडल्याने स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात या दुकानाच्या समोर लावलेले बॅनर काढण्यात आले होते, आणि अवघ्या महिनाभरातच दुकानाला आग लागल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे सांगितले जात आहे. पोलीस प्रशासने तपास सुरू केला असून, आगीचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या