spot_img
spot_img
spot_img

श्री कुलस्वामिनी माध्यमिक आश्रम शाळेचा स्वयंशासन दिन व राजर्षी शाहू महाविद्यालयाचा निरोप समारंभ साजरा*

आवाज महाराष्ट्र न्यूज: रिपोर्टर विजय पिसे जळकोट

७ फेब्रुवारी २०२५ वार शुक्रवार रोजी श्री कुलस्वामिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा जळकोट ता.तुळजापूर जि.धाराशिव शाळेतील इयत्ता दहावीच्या मुलांने स्वयंशासन दिन व उच्च माध्यमिक आश्रमशाळाची निरोप समारंभ अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ जळकोट चे तथा प्राचार्य संतोष चव्हाण प्रमुख पाहूणे प्राथमिक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका आशा पवार ,नागेंद्र गुरव ,रविकिरण चव्हाण,सुरेश कोकाटे,खंडेराव कारले श्रीमती शांताबाई चौगुले यांनी उपस्थिती लावली पहिली ते सातवी व माध्यमिक आश्रमशाळेतील आठवी ते नववी वर्गास अध्यापनाचे कार्य केले. सकाळी परिपाठ ते सायंकाळी वंदेमातरम् पर्यंत शाळा चालवली.प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापिका राजश्री राठोड माध्यमिकचे मुख्याध्यापक म्हणून मंडले प्रदीप, प्राचार्य ऋतुजा कदम तर सेवक म्हणून गणेश चव्हाण यांनी काम पाहिले. दहावी वर्गातील 65 कॉलेज चे 30 विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून भूमिका पार पाडली. यांना मार्गदर्शन पांढरे डी.एम,ढोले के.ए,मुखम बी.एस,हक्के बी.जी,साबळे ए.एच,दुधभाते एस.एन,राठोड बी.बी,श्रीमती लवंद कल्पना,कुंचगे प्रमिला,अश्विनी लबडे, यांनी काम पाहिले.

स्वयंशासन दिनाचे वैशिष्ट्य-

स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत उत्कृष्ट अध्यापन केले.त्यातील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक देण्यात आले.

1) ऋतुजा कदम

2) प्रदीप मंडले

3) राजश्री राठोड

भावनिक निरोप

कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण वातावरण अत्यंत भावनिक झाले होते.प्रत्येक शिक्षकांच्या डोळ्यात अश्रु होते.तर विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी जपत भावूकपणे निरोप घेतला.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्यासाठी सुसंस्कार व शिक्षणाचे महत्व पटवून दिले.दहावी ,बारावी विद्यार्थ्यांनी शाळेला एक संगणक संच भेट दिला.

या कार्यक्रमाला किरण कांबळे, कदम डी.टी.कमारी मयुरी कांबळे,सागर चव्हाण अमितसिंह खारे, शंकर चव्हाण,सुग्रीव देवकते,किसन पांचाळ, बालाजी अहंकारे उपस्थित होते. अतिशय उत्कृष्ट शाळा चालवून नवीन पिढी समोर एक सर्वोत्कृष्ट आदर्श ठेवला. शेवटी सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला व स्वयंशासन दिन संपन्न झाला.

Related Articles

ताज्या बातम्या