spot_img
spot_img
spot_img

जळकोट येथे बौद्ध पुजा पाठ पुस्तकाचे वाटप करून रमाई जंयत्ती साजरी

जळकोट (अरुण लोखंडे):

एकीकडे अनेक प्रकारचे वाण लुदून हळदी कुंकू कार्यक्रम घेऊन महिलांचे संघटण करताना दिसत आहे तर दुसरीकडे तुळजापूर तालूक्यातील भिमनगर जळकोट येथील बौध्द महिला मात्र बौध्द पुजा पाठ पुस्तकाचे वाटप करून विविध उपक्रमाने माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करून समाजप्रबोधन करताना दिसत आहेत.

या बाबत वृत्त असे की जळकोट येथे त्याग मूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने येथील महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माजी सरपंच

ज्योती अरुण लोखंडे,कोमल माने,सोनल भालेराव,सपना गायकवाड,सुप्रिया लोखंडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करून त्रिशरण पंचशिल ( बुध्द वंदना) घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने जळकोट प्राथमिक आरोग्य केद्राच्या वैद्यकीय आधिकारी ईश्वरी धायगुडे मॅडम आरोग्य सेविका सिंधू लोखंडे आशा सेविका रेणुका नळगे शालीनी कडते उपस्थित होते तर या प्रसंगी जळकोट प्राथमिक आरोग्य केद्रात सलग वीस वर्ष रुग्ण सेवा केलेल्या आरोग्य सेविका सौ गोकर्णा ढगे मॅडम यांचा सेवा निवृती पर सत्कार करण्यात आला.

त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. शालेम मुलींनी भिमगितावर नृत्य सादर केले तर

महिलानी रमाई च्या जीवन चरीत्रावर गितांचे सादरीकरण

केले. यावेळी उषा कदम प्रज्ञा लोखंडे अस्मीता लोखंडे वर्षा गायकवाड प्रज्ञा माने राधिका लोखंडे बबीता लोखंड साधना लोखंडे वैजता लोखंडे सुर्वणा लोखंडे मनिषा लोखंडे स्वाती लोखंडे शोभा लोखंडे सुकमार सोनकांबळे रेषा सोनकांबळे सुनिता लोखंडे सुमन लोखंडे अनुसचा साखरे कांचन लोखंडे लता माने आशा लोखंडे लक्ष्मी लोखंडे भिवरा लोखंडे गेंदा भालेराव रोहीणी माने श्यामल सोनकांबळे कस्तुरा लोखंडे शुंभागी लोखंडे शुंभागी सोनकांबळे शितल लोखंडे सुशीला लोखंडे नेहा लोखंडे सपना लोखंडे पृथ्वी बनसोडे स्नेहा माने संस्कृत्ती भालेराव पुजा गायडवाड श्वेता गायकवाड अर्पिता लोखंडे सुमती लोखंडे सह मंडळाच्या महीला मोठया संख्येने उपस्थित होते शेवटी बुध्द पुजा पाठ पुस्तकांचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्र संचलन आभार आशा सेविका मनिषा गायकवाड यांनी मानले सांगता शरणतय गाथा घेवून करण्यात आली .

Related Articles

ताज्या बातम्या