spot_img
spot_img
spot_img

राजाराम अंबादास चंदनशिवे यांची, संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड…..

तुळजापूर प्रतिनिधी :- अणदूर येथील राजाराम अंबादास चंदनशिवे यांची संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी महाराष्ट्र संकल्प बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उमेश काळे साहेब यांनी चंदनशिवे यांची निवड केली.त्यांची तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अणदूर व परिसरातील अनेक सामाजिक मंडळे आणि प्रतिष्ठित मान्यवर चंदनशिवे यांचं अभिनंदन केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अणदूर व परिसरातील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या चंदनशिवे यांनी अनेकांना बांधकाम मिस्त्री सेंट्रिग मिस्त्री कामगार म्हणून रोजगार मिळवून दिला आहे. सध्या त्यांच्या कडे ४० मंजूर काम करतात.

अणदूरच्या परिसरात खात्रीशीर गुत्तेदार म्हणून त्यांचा लौकिक आहे.संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून ते निश्चितच बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देतील.अणदुर येथील मराठवाडा बांधकाम कामगार संघटना अध्यक्ष राजाराम अंबादास चंदनशिवे यांची संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल बांधकाम कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

उस्मान नदाफ,बाबु नदाफ, नागनाथ कांबळे,प्रकाश बंदपट्टे यांनी त्यांचें अभिनंदन केले.

Related Articles

ताज्या बातम्या