पुणे जिल्हा प्रतिनिधी (अजिंक्य मस्के)
छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल राहुल सोलापूरकर ने खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ दलित पॅंथर संघटनेच्या वतीने आज मोठे आंदोलन करण्यात आले. दुपारी राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील घरासमोर पक्षाच्या व संघटना च्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.
आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राहुल सोलापूरकर याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरला कायदेशीर शिक्षेस सामोरे जावेच लागेल. सरकारने तातडीने कारवाई न केल्यास मोठे जनआंदोलन उभारले जाईल.”पॅंथर स्टाईलने राहुल सोलापूर कर याला धडा शिकवला जाईल व त्यांना महाराष्ट्रभर फिरू नाही” देणार असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून घेण्यात आला यावेळी
दलित पॅंथर संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व अनेक भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे