पुणे, जिल्हा प्रतिनिधी (अजिंक्य मस्के): जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला ‘शिवबा’ होता. शिवजयंती हा केवळ सण नाही, तर प्रेरणादायी पर्व आहे! या वर्षी शिवजयंती साजरी करण्याबरोबर शिवरायांचे जगण्यासाठीचे विचार अंगिकारण्यासाठी सुद्धा करूयात! शिवराय म्हणजे केवळ इतिहास नव्हे, ते आपली ओळख आहेत, आपला अभिमान आहेत !
आज आपण शिवरायांना केवळ जयघोषापुरते मर्यादित ठेवतोय का? त्यांचे विचार, त्यांचा आदर्श आपल्या कृतीत आहे का? ह्या गोष्टीचा विचार करून श्री. साई एज्युकेशन ट्रस्ट व जनहित पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्केटींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कॅम्प पुणे येथे श्री साई एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर रामभाऊ शेडगे व जनहित पत्रकार संघ महाराष्ट्र राजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष पोपटराव कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने द विश्व वर्ल्ड बुक रेकॉर्ड व मिरॅकल बुक रेकॉर्ड स्केटिंग स्पर्धा २०२५ उत्साहात पार पडली. वयोगट ४-६, ८ – १०, १२-१४, व खुला गट यामध्ये महाराष्ट्रातील तीनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा १ तास १९ मिनिटे व १९ सेकंद एवढ्या कालावधीत पूर्ण करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले जनहित पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, श्री. अमोल पवार व श्री. अविनाश पवार सर यांच्या शुभहस्ते ट्रॉफी व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले. क्रीडा शिक्षक श्री. दीपक चव्हाण सर, श्री. शफिक सर व श्री. धनंजय मदने सर यांनी स्पर्धकांना स्पर्धेचे नियम व अटी सांगून स्पर्धेला सुरुवात केली. क्रीडा शिक्षक प्रिन्स कांबळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री संजय कांबळे सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. हा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्यामध्ये सहभागी सर्व क्रीडा शिक्षक मार्गदर्शक पालक व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.