spot_img
spot_img
spot_img

जळकोटला अवैदय दारु विकणारे जोमात पिणारी तरुण पिढी कोमात  पोलीस वसीलीच्या कामात व्यस्त : ड्रग्ज माफीचाचे लोन ग्रामीण भागात पसरत असल्याची शकता नाकारता येत नाही

जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील जळकोट आणि परिसरात अवैद्य धंदयाला ऊत आला असुन राष्ट्रीय महामार्गावर मुख्य ठिकाणी दारूची दुकाने थाटली असुन यामध्ये तरुण पिढी व्यसनाधिन होऊन बर्बाद झाल्याचे चित्र सदया तरी पाहावयास मिळत आहे .

याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट हे गाव राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून गावाला मोठी बाजार पेठ आहे दैनदिन व्यवहारासाठी हजारो नागरीकांची नेहमीच वर्दळ असते . या ठीकाणी अनेक अवैध्य धंदे या ठिकाणी राजरोसपणे चालतात याकडे कोणाचेही लक्ष नाही यामध्ये सदया ड्रग्ज सारखे आमली पदार्थाचे लोन सदया तुळजापूर शहरात पसरलेले आहे त्याचे जाळे सुद्धा ग्रामीण भागात का पसरणार नाही सदया असुही शकत नाही . कारण या ड्रग्ज प्रकरणातील एक आरोपी ग्रामीण भागतला असल्याचे निष्पन्न झाले आहे . अनेक तरुण पिढी यांचा सतत ही गावठी दारू गांजा प्राशासन करून करून लीव्हर खराब होऊन अनेकजन मृत्यूला कवटाळेले आहेत अनेक महिला तरुण वयात विधवा झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे .

याकामी पोलीस प्रशासनाचा संमधीत अवैद्य धंदेवाल्याला आर्शिवाद आहे त्यांच्याच सहकार्याने सदया परिसरात धंदे जोमात चालू असून जळकोटचा शनिवारी आठवडी बाजार असतो बाजार दिवशी बऱ्याच गावचे लोक आठवडी बाजार करण्यासाठी येतात या दिवशी तर मंदयधूद अवस्थेत झिंगत बाजार पेठेत फिरताना अनेक बाजार करू महीला पुरुष याना याचा नाहाक त्रास सहन करावा लागत आहे . यामध्ये पोलीसांची महिन्याला वसुली जोरात चालते जळकोट मधून महिन्याला पोलीसांना चांगली रसद मिळते म्हणुन पोलीस तेरी भी चूप मिरी भी चूपची भुमीका सदया पोलीस प्रशासनाची आहे . म्हणून सदया दारु विकणारे जोमात पोलीस प्रशासन पण जोमात मात्र जळकोटची युवा पिढी मात्र कोमात असुन अनेक युवक अंथारुणावर खितपत पडलेले चित्र परिसरात पहावयास मिळत आहे

या अवैद्य धंदयाला ओळा बसणार की नाही ही चर्चा नागरीकांतुन व्यक्त होताना दिसत आहे .

.

Related Articles

ताज्या बातम्या