पुणे जिल्हा प्रतिनिधी (अजिंक्य मस्के)
श्री साई एज्युकेशन ट्रस्ट संचालित वै. आबाजी बाबुराव वाशिवले
गरजू व निराधार मुलांचे वसतिगृहाचे म्हातोबा नगर
कोथरूड, पुणे येथे ग्रामीण भागातील अनाथ व गरजू मुलांसाठी निवासी वसतिगृह उभारण्यात आले आहे. या वसतिगृहात २४ मुलांना कमवा व शिका योजनेअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे जाणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याकरता पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असते हे लक्षात घेऊन वसतिगृह उभारण्यात आले आहे. या ठिकाणी शौचालय, प्रसाधनगृह, व शिक्षण आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
या वसतिगृहात दहावीच्या वरती वयोगटातील गरीब, दुर्बल घटक, अनाथ व गरजू मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी अधिक माहितीसाठी श्री साई एज्युकेशन ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री सागर शेडगे सर यांनी केले आहे. ही वास्तू उभारण्याकरता लक्ष्मण आबाजी वाशी वाले यांनी स्वतःची जागा वसतिगृहासाठी दिली ही वसतिगृह उभारण्यामध्ये कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी भरघोस मदत करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची जबाबदारी स्वीकारली या वसतिगृहाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते झाले यावेळी हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज वांजळे राजेंद्र कोंढरे श्री अशोक काळभोर डॉक्टर संदीप बुटाला मंदार देवगावकर नानासाहेब मारणे सुरेखाताई होले श्री सोपान वांजळे दत्तात्रय कडू श्री सदानंद तोंडे दगडू काका करंजावणे दिलीप शेठ चोरगे नितीन माझे रे अमोल पवार सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री सागर शेडगे यांनी केले मनोगत सोपान वांजळे यांनी मांडले सूत्रसंचालन प्राध्यापक विजय मराठे यांनी केले व आभार भाऊसाहेब गाजरे यांनी मांडले.