अणदूर प्रतिनिधि…. सामाजिक पत्रकारिता व दलित चळवळीत गेली अनेक दशकापासून सक्रिय असलेले जेष्ठ समाजसेवक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव, संकल्प बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस टाइम्स धनगर शक्ती न्यूजचे सहसंपादक, माननीय आर एस गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना जिल्हा जळगाव येथील श्रावस्ती ग्राफिक्स तर्फे दिला जाणारा समाजसेवक हा सामाजिक बांधिलकीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीत गेल्या अनेक दशकापासून ते कार्यरत आहेत. दलित पॅंथर चळवळीपासून ते आज पर्यंत आंबेडकरी चळवळीतील एक विद्रोही स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून ते संपूर्ण जिल्हाभर परिचित आहेत. अनेक आंदोलन मोर्चे काढून ते सामाजिक प्रश्नांना वाचा फोडले आहे. एक क्रियाशील स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून ते समाजाची सेवा बजावत असतात .आज पर्यंत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.दिनां २४/२,२०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील श्रावस्ती ग्राफिक्स यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन आर एस गायकवाड यांना समाजसेवक हा मानाचा पुरस्कार दिला आहे .त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस टाईम्स चे मुख्य संपादक उमेश काळे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य आदरणीय डॉ नितीन ढेपे साहेब, सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे माजी अध्यक्ष श्रीशैल गायकवाड साहेब ,वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा टीम, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अंकुश लोखंडे मेजर साहेब, परिवर्तन सामाजिक संस्था सर्वेसर्वा मारुती बनसोडे, अँड रामचंद्र ढवळे साहेब, तसेच ज्येष्ठ पत्रकार मित्र राजा स्वामी पत्रकार मिलिंद गायकवाड पॅंथर जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद, पत्रकार लक्ष्मण दुपारगुडे पत्रकार आकाश आलकुंटे, पत्रकार राहुल कांबळे( आर के) डी आर गायकवाड ,,राजाराम चंदनशिवे, संकल्प बांधकाम कामगार संघटना तुळजापूर तालुका अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे फोन करून व प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आहे. समाजसेवक हा पुरस्कार योग्य माणसाला मिळाल्याचे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.