spot_img
spot_img
spot_img

रामशेट्टी सर यांनी घेतली मोटेगावकर सरांची भेट 

आवाज महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर: विजय पिसे जळकोट

जळकोट येथील समर्थ कोचिंग क्लासेसचे संचालक, ‘द इंग्लिश लँग्वेज पुस्तकाचे लेखक’ रामशेट्टी पाटील सर यांनी लातूर येथील आर.सी.सी क्लासेसचे संचालक प्रा. मोटेगावकर सर यांची भेट घेऊन शैक्षणिक विषयावर चर्चा केली. यावेळी मोटेगावकर यांनी लातूर येथील त्यांच्या क्लासेसमध्ये रामशेट्टी सरांचा यथोचित सत्कार करून सोबत असल्याचे सांगितले. समर्थ क्लासेसच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरे, पालक मेळावे यांचे सतत आयोजन केले जाते यामुळे परिसरातील विद्यार्थ्याना याचा नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भेटींमुळे जळकोट व परिसरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास नक्कीच होणार आहे हे महत्वाचे आहे. त्यांच्या कार्याला पालक वर्गातून कौतुक केले जाते.

Related Articles

ताज्या बातम्या