spot_img
spot_img
spot_img

पोलीस निरीक्षक सचिन यादव व तुळजापूर च्या अण्णासाहेब मांजरे यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सत्कार 

नंदगाव प्रतिनिधि ( शाम नागिले ):

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन यादव व तुळजापूर येथे अण्णासाहेब मांजरे यानी नुकतच आपल्या पदाचा पदभार स्विकारून ते नळदुर्ग पोलीस ठाणे व तुळजापूर येथे मांजरे साहेब येथे रुजू झाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.

या बाबत सविस्तर असे की, नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक गजेंद सरोदे यांची पोलीस प्रशासना कडून अचानक पणे तात्काळ बदली झाल्याने त्यांच्या जागी सचिन यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून ते नळदुर्ग पोलीस ठाणे येथे रूजू झाले आहेत. व तुळजापूर येथे अण्णासाहेब मांजरे साहेब हे रुजू झाले आहेत,त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,उपाध्यक तथा जेष्ठ पत्रकार इरफान काझी यांच्या हस्ते यथोचित स्वागत पर सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे सचिव एस.के. गायकवाड, दलित पँथर जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार शाम नागीले,किशोर धुमाळ, विजय पिसे, आरविंद

लोखंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या