spot_img
spot_img
spot_img

सिद्धेश्वर कोरे यांच्या वाढदिवसा निम्मित शिव-बसव पाणपोईचे उद्घाटन 

नंदगाव प्रतिनिधि (शाम नागिले) तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे बस स्टँड वरती माजी पंचायत समिति सदस्य सिद्धेश्वर कोरे यांच्या वाढदिवसा निम्मित शिव-बसव पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले .

या बाबत सविस्तर असे की , तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे माजी पंचायत समिती सदस्य तथा कृषि उत्पन्न बाजार समिती तुळजापूर संचालक श्री सिद्धेश्वर बाजीराव कोरे याचा 26 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला व यांच्या वाढदिवसाचे अवचित साधून सामाजिक कार्यकर्ते सतीश काटे यांनी त्यांच्या मार्फत शिव-बसव पाणपोई बस स्टँड वरती सुरुवात करण्यात आली . या पाणपोई चे उद्घाटन सिद्धेश्वर कोरे यांच्या हस्ते करण्यात आली . नंदगाव गावास आसपासच्या गावातील नागरिक बाजार करण्यासाठि व इतर कामासाठी ये-जा करत असतात व सध्या उनाची रखरखता भासत असून घस्याला कोरड पडत आहे यामुळे नंदगाव चे सामाजिक कार्यकर्ते सतीश काटे यांनी या नागरिकांनसाठी व गावातील नागरिकांनसाठी थंडगार पिण्याच्या पाण्याची शिव-बसव पाणपोई च्या अनुषंगाने सोय केली आहे .या वेळी माजी सरपंच श्रद्धांनंद कलशेट्टी ,सध्याचे सरपंच पुत्र परमेश्वर चिनगुंडे,इंजिनीअर कांबळे साहेब ,राजू तुप्पे , अप्पा सुरवसे ,परमेश्वर शिवगुंडे , दलित पॅंथर जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार शाम नागिले , सामाजिक कार्यकर्ते सतीश काटे ,विश्वजित घंटे , अमर कांबळे , सामाजिक कार्यकर्ते सचिन कोरे ,लालू राठोड, कट्टे ,बशेट्टी ,आतकरे आदि उपस्थित होते .

Related Articles

ताज्या बातम्या