spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग ते लोहगाव रस्ता त्वरीत दुरुस्त करावा : लोहगाव येथील ग्रामस्थाची मागणी

जळकोट (अरुण लोखंडे ) तुळजापूर तालुक्यातील नळदूर्ग ते लोहगाव जाणारऱ्या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासुन रखडले असून ते काम तात्काळ पूर्ण करून नागरीकांस होणारा त्रास थांबवावा ही मागणी होत आहे .

याबाबत प्राप्त माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नळदूर्ग लोहगाव नंदगाव सिंदगाव ते बाळगाव हया रस्त्याचे नतुनीकरणाचे काम गेल्या वर्षाभरा पासून चालू आहे मात्र आद्याप रस्त्याचे काम काही पूर्ण झाले नाही अंत्यत संथ गतीने हे काम चालू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे संपूर्ण रस्ता उखल्याने प्रवाशासह वाहनचालकास खूप कसरत करावी लागत आहे .

सदर रस्ता हा व्यवस्थित पणे व्हावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आठ कोटी चे बेजेट या कामांकरिता संमधीत विभागाने मंजुर केले मंजुरी मिळली पण मात्र काम मात्र वेळत होत नाही झालेले कामही व्यवस्थित पणे होत नसतानाचे दिसत आहे ज्या ठिकाणी पुलाचे काम झाले आहे त्या ठिकाणाचे काम व्यवस्थित झाले नाही झालेल्या बांधकामावर पाणी मारले नसल्याने राख फासल्या सारखे काम दिसत आहे . रस्त्याच्या दोन्ही बाजुस साईड पट्टीचे काम करून रोडच्या कडेला आलेली झाडेझुडपे तोडून साईडपट्टी मोठी करणे गरजचे असताना त्यांच अरुंद रस्त्यावर खडी दगड टाकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेकदा छोटे मोठे अपघात झाले आहेत त्यात दैनदिन शाळा महाविद्यालयात येणारे शाळेकरी मुले मुली दवाखान्यासाठी जाणाऱ्या नागरीकांना याचा खूप मोठा त्रास होत आहे अनेकदा येथील नागरीकांनी संबधीत बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यास लेखी तक्रार देवून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे मात्र संबंधीत विभागही या कडे जाणिवपूर्वक डोळे झाक करीत आहे असे येथील ग्रामस्थाचे म्हणणे आहे . ज्यांनी हे काम घेतले आहे त्यास संमधीत विभागाने सागुन या रस्त्याचे काम लवकर करून लोहगाव सह परिसरातील ग्रामस्थाची होणारी कुंचबना थांबवी अशी मागणी लोहगाव येथील नागरीकांनी केली आहे .

Related Articles

ताज्या बातम्या