पुणे जिल्हा प्रतिनिधी (अजिंक्य मस्के)
अक्कलकोट तालुक्यातील किरनाळी
येथे सालाबादप्रमाणे यंदाही ग्रामदैवत श्री चंद्रादेवी यात्रेस सोमवार (ता. ३) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
सोमवारी सायंकाळी सात वाजता चंद्रादेवी पालखी व घोडा भुरीकवठे येथे मुक्कामी जाणार आहे. मंगळवारी (ता. ४) सकाळी आठ वाजता ढोल नगारे, भारूड व भजनासह वाजत गाजत भुरीकवठे येथून पालखी व घोड्याची किरनळ्ळीत आगमन होऊन महादेव मंदिरात भेट होईल. महाप्रसादानंतर मनोरंजनाचे भारूड, भजन, पोवाडा व लोकगीते यांसारखे कार्यक्रम आयोजित ग्रामदैवत चंद्रादेवी मंदिर येथे केले आहे
. बुधवारी (ता. ५) पहाटे श्री चंद्रादेवी मूर्तीस अभिषेक, दुपारी बारा वाजता देवीचा छबिना व रथोत्सव भक्तिमय वातावरणात होणार आहे. सायंकाळी चार वाजता नामवंत मल्लांची जंगी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. त्यानंतर शोभेचे दारूकाम व रात्री दहा वाजता कन्नड मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. यात्रेस मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक उपस्थित असतात. सर्व भक्तांना महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन किरनाळ्ळी गावचे सरपंच श्रुती अरविंद भांगे व पंचकमिटी, पुजारी मंडळी व ग्रामस्थांकडून
करण्यात आहे. आले