spot_img
spot_img
spot_img

नंदगाव  परिसरात  अवैध्य धंद्यांचा सुळसुळाट प्रशासन मात्र आरामात.

नंदगाव प्रतिनिधी (शाम नागिले ) तुळजापर तालुक्यातील नंदगाव आणि परिसरात अवैध्य गावठी दारू धंद्याला ऊत आला असुन चक्री हा खेळ मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे पहावयास मिळत आहे,तर कल्याण बसू देईना व मुंबई झोपू देईना अशी परस्थिती झाली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की नंदगाव व परिसरातील दहा ते बारा गावाचा वाडी ,वस्ती ,तांड्याच्या नागरीकांची दररोजच्या दैनदीन लागणाऱ्या वस्तुची खरेदी विक्रीसाठी लोकांची येणे जाणे कायम असते , आशातच नंदगाव येथे गावठी दारू खुले आमपणे चालू आहे त्यात मटका कल्याण बसू देईना तर मुंबई झोपू देईना अशी परस्थिती झाली आहे यातच नंदगाव रोड वर चक्री नावाचा खेळ खेळवला जातो यामध्ये अनेक तरुण हा खेळ खेळण्यासाठी परगावाहून येतात यामध्ये अनेक तरुण अति पैसे कमवण्याच्या नादात कर्जबाजारी झाले असून अनेकांचे संसार उदवस्त झाले आहे . चक्री हा खेळ खेळण्याच्या नादा मध्ये चक्रम झाल्या सारखे फिरताना दिसत असून व्यसना धिनतेच प्रमाण वाढले आहे येथील एका तरुणाने तर एका तासात लाख ते दोन लाख या चक्री खेळामध्ये घालविले असल्याचे समजते असे अनेक तरुण आहेत की लाखो रुपये या खेळाच्या नादात घालून आर्थिक विवचनेत अडकल्याचे दिसत आहे . सदस्च्या या अवैद्य धंदयाकडे पोलीस मात्र डोळे झाक करीत आहेत कारण त्यांना त्यांची महिन्याला ठरलेली रक्कम (हप्ता)मिळते म्हणुन त्याचे आपल तेरी भी चूप मेरी भी चूप तुमचं ते चालू द्या . अश्या पद्धतीने याचा हा खेळ चालेला आहे .

पाच सहा वर्षा पूर्वी नळदुर्ग येथील युवक विशाल जगताप या युवकाने या खेळाच्या पायात कर्ज बाजारी होऊन आपली जीवन यात्रा संपवली होती त्यावेळेस त्यांच्या आईने पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्याकडे धाव घेवून हा चक्री अवैदय खेळ आहे तो बंद करण्यासंमधी मागणी केली असता औरंगाबाद परिमंडळाचे व आताचे संभाजी नगर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब (आय जी ) यानी यावर कडक निर्बध आणले होते पण तेही फक्त काही दिवस चालले आणि परत नव्याने या भागात चक्री हा खेळ मोठ्या प्रमाणात चालू असून अनेक तरुण पिढी या चक्रव्यहूत अडकल्याचे दिसत आहे , या खुलेआम पणे दारू ,मटका ,चक्री चालू आहे याला नक्की कोणाचे आशीर्वाद आहे पोलिसांचे की पुढार्‍यांचे ? या अवैद्य धंद्यांला कायमची बंदी घालावी असी मागणी सुजान नागरीकामधून होत आहे .

Related Articles

ताज्या बातम्या