spot_img
spot_img
spot_img

अपहृताची सहा तासांत हडपसर पोलिसांकडून सुटका

पुणे जिल्हा प्रतिनिधी (अजिंक्य मस्के) – आर्थिक व्यवहारातील पैसे बसूल करण्याच्या हेतूने एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, अपहरणाची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी सहा तासांत अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका करून आरोपींना अटक केली. याप्रकरणी शुक्रवारी (दि. ७) पहाटे हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राजस दीपक पंडित (वय २५, रा. त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हरिलाल विश्वकर्मा यांनी सांगितले, की गुरुवारी (दि. ६) रात्री साडेदहाच्या सुमारास ४ ते ५ जण घरी येऊन फर्निचरचे काम असल्याचे सांगत बाडील हरिलाल रामखिलावन विश्वकर्मा यांना घेऊन गेले. त्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांच्या बडिलांनी फोनद्वारे घाबरत उद्या सकाळी घरी येतो, असे सांगून फोन बंद केला.

त्यामुळे योगेश यांनी नियंत्रण कक्षासह हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले व पथकाने हरिलाल विश्वकर्मा यांचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासात संशयित इसम हे वेळोवेळी आपले

ठिकाण बदलत होते. त्यानंतर पोलिसांना संशयित इसम खेड-शिवापूर, शिंदेवाडी, जांभूळवाडी, नन्हे भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून प्राजसला ताब्यात घेतले. हरिलाल हे त्याच्यासोबतय असल्याने पोलिसांनी त्यांची सुटका केली.

प्राथसला सोडविण्याची ही कामगिरी गुन्हे निरीक्षक नीलेश जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गैड, कर्मचारी अजित मदने,अविनाश गोसावी, संदीप राठोड, श्रीकांत पाटुळे, दीपक कांबळे, चंद्रकांत रेजितयाड, अमोल दणके यांच्या पथकाने केली.

Related Articles

ताज्या बातम्या