वागदरी (एस.के.गायकवाड):
छत्रपती शिवाजी महाराज याना घडविणारी माँ.जिजाऊ,उत्तम प्रशाशक राजमाता आहिल्यादेवी होळकर,क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या क्रांतीकारी विचारांचा आदर्श समोर ठेवून स्त्रियानी शिक्षण
घेवून आपली प्रगती साधण्याचा प्रयत्न करवा कारण एक स्त्रि शिकली तर संपूर्ण कुटूंबाची सुधारणा होते,घराला घरपण येते.असे गौरव उदगार येथील वैद्यकिय आभिकारी डॉ.अभिजीत बागल यानी नळदुर्ग येथे बोलताना काढले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) शहार शाखा नळदुर्ग व भाजपा मेडिया सेल च्या वतीने उप जिल्हा रुग्नालय नळदुर्ग ता.तुळजापूर येथे जागतिक महिला दिना निमित्त सर्व आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका व महिला आधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षिय स्थानावरून डॉ.बागल बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की घर संसाराची सर्व कोटूंबिक बजाबदारी सांभाळून आमच्या महिला आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्या प्रामाणिक पणे बजावत रुग्नाची
सेवा करतात.या वेळी प्रामुख पाहूणे म्हनूण वैद्यकिय आधिकारी डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.अविनाश भोरे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरोग्य महिला कर्मचारी निर्मला तोडकर,अनिता कोळी, निर्मला भालेराव, काळे एस.मॅडम,एम. ए. मुल्ला,आश्विनी शेरखाने,पुजा केसकर,जयश्री गुंड, आदींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइं (आठवले ) चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यानी केले तर अभारप्रदर्शन रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यानी केले. यावेळी रिपाइंचे नेते दुर्वास बनसोडे,नळदुर्ग शहर कार्याध्यक्ष महादेव बनसोडे,उत्तम झेंडारे,अनिल वाघमारे,भाजपा माडिया सेल चे तालूका अध्यक्ष किशोर धुमाळ, अरोग्य कर्मचारी सुरेश शेलार,उद्धव मस्के,सह कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी सुखी मल्टी स्टेट नळदुर्ग च्या वतीने ही विलास हाडगे,अजय ठाकूर, रामानंद लंगडे यानी ही जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने येथिल सर्व महिला आरोग्य कर्मचारांचा सत्कार करण्यात आला.