spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर तालुक्यातील भिमनगर वागदरी येथे कचऱ्याची होळी

वागदरी प्रतिनिधी (एस. के. गायकवाड):

पारंपारिक पद्धतिला फाटा देवून तुळजापूर तालुक्यातील भिमनगर वागदरी येथे कचरा जाळून अधूनिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली.

  वाट्स अँप वर होळी च्या शुभेच्छा देताना एका व्यक्ती ने टाकलेल्या मेसेज मध्ये अस वाचायला मिळाले की

 ” जमा करतोय आज

  तिरस्काराची लाकड,

   मत्सराच्या गोवऱ्या,

    हेव्या – दाव्याचे गवत, 

    होळीत दहन करायचं आहे, ज्वाळ गगनास भिडवायचा आहे”.

   फक्त्त माणूस कळला पाहिजे,

माणूस जपला पाहीजे.

  असं म्हटल असल तरीही आज संगणक युगाच्या गप्पा मारत मारत सर्व कर्मकांड जोपासत पारंपारीक पध्दतिने सर्वत्र होळी सण साजरा करण्यात आला. परंतू भिमनगर वागदरी येथे मात्र कार्यकर्ते यानी येथील समाज मंदिरा समोरील पटांगण साडून सर्व कचरा एकत्र करून कचऱ्याचा ढिग केला आणि कचऱ्याच्या ढिगाची होळी पेटवून स्वच्छतेचा संदेश देत अधुनिक पध्दतीचे होळी सण साजरा केला.या वेळी भिमशाहीर शिवाजी वाघमारे, अनिल वाघमारे, नामदेव वाघमारे, एस.के. गायकवाड सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या