spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग बसस्थानका समोरीलं पटांगणाचे सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम अंतिम टप्यात : येणाऱ्या पावसाळ्यात नळदुर्ग बसस्थानक चिखल मुक्त राहणार.. 

प्रतिनीधी वागदरी (एस. के. गायकवाड):

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळनजापूर सह विविध पक्ष संस्था संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षा पासून नळदुर्ग बसस्थानकाच्या समोर पटांगणात सिमेंटीकरगण करावे या मागणीसठी पाठपुरावा केल्यामूळे सध्या नळदुर्ग बस स्थानकात सिमेंटकाँक्रेटचे काम चालू असून ते काम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात नळदुर्ग बसस्थानक चिखल मुक्त राहणार असल्याने प्रवाशी नागरीकातून समाधान व्यक्त केले जात आहे.

 मुंबई ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ पूर्विचा ९ वर सोलापूर पासुन ४५ कि.मी. अंतरावर वसलेले नळदुर्ग ता. तुळजापूर या ठिकाणी राज्यात सर्वात मोठा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. किल्ल्यामुळे नळदुर्ग या शहराला पर्यटन स्थळाचा दर्जा लाभला आहे.राष्ट्रीय महामार्गालगतच नळदुर्ग येथे बसस्थानक आहे. नळदुर्ग हे तुळजापूर तालूक्यातील जवळपासघ ६५ गावांच्या केंद्र स्थानी असल्याने हे एसटी बसस्थानक अत्यंत महत्वाचे मानले जाते.सतत या बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ असूते.पावसाळ्यात तर येथिल ऐतिहासिक किल्ला पहाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.पावसाळ्यात येथिल बस स्थानकाच्या पटांगणात चिखल मातीचा राडा होऊन प्रवाशान बस मध्ये चढण्यासाठी व बस मधून उतरल्या नंतर चिखल माती तुडवतच बस कडे ये जा करावी लागत होते. त्यामुळे प्रवाशाना खूप त्रास सहन करावा लागत असे.यामुळे नळदुर्ग बस स्थानकाच्या पटांगणा डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करावे असी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका शाखा तुळजापूर सह विविध पक्ष संस्था संघटनेच्या वतीने व प्रवाशी वर्गातुन वारंवार महामंडळाकडे करण्यात येत होती.प्रसिध्दी माध्यमातून स्थानिक पत्रकारानी ही मागणी लावून धरली होती. यामुळे गेल्या चार पाच महिन्या पासून या बस स्थानकाच्या पटांगणात सिमेंट काँक्रेटीकरण्याचे काम चालू करण्यात आले असून ते काम सध्या अंतिम टप्यात आहे. येथील कर्तव्यदक्ष वहातुक नियंत्रक महेश डूकरे हे स्वतः जातीने लक्ष देवून सदर काम चांगल्या प्रतिचे करून घेत आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात नळदुर्ग एसटी बसस्थानक हे चिखल मूक्त होणार यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या