.धाराशिव प्रतिनिधी .
तमाम डॉक्टर बाबासाहेव आंबेडकर अनुयायांना व जयंती उत्सव मंडळांना नम्र आवाहन करण्यात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव महाराष्ट्र भारत देश येथेच नव्हे तर जगातील अनेक देशात हा कार्यक्रम संवेदनशीलतेने व आदराने आदर्श उपक्रमाने संपन होत असतो आणि हा महोत्सव जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत आंबेडकर प्रेमी जनता अनुयायी यांच्याकडून साजरा केला जाणार आहे पण वर्षानुवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे स्वरूप विकृत स्वरूपात बदलत चालले आहे हे कटू असले तरी सत्य आहे याचं आपण आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे या जयंती उत्सव संदर्भाने इतर व्यक्ती संघ संघटना राजकीय पक्ष यांचेकडून धम्मदान व वर्गणीसाठी सार्वजनिक न्यास नोंदणी न केलेले पावती पुस्तके उपयोगात आणली जातात पारदर्शी व्यवहारासाठी त्या पावतोबर वर्गणी घेणान्या पदाधिकान्याचे नाव फोन नंबर असे असणे अत्यावश्यक असते जनतेचा विश्वास संपादन करायचं असेल तर पारदशी व्यवहार पाचा सारखा दुसरा पुरावा कोणता असु शकत नाही प.पू. डॉक्टर बाबासाहेच आंबेडकरांच्या प्रतिमेला व नावाला अवमान होईल असे काहीही आपल्या हातून घडता कामा नये. सबब पुढील बाबी लक्षात घ्याव्यात ही विनंती.
१) प.पू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संदभनि सर्वांनो न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी केलेल्या मंडळ व पदाधिका-यांनी नाव पत्ता व मोबाईल क्रमांक नोंदलेला असावा.
२) वर्गणी संकलित करताना याचना अथचा सक्ती होता कामा नये सन्मानपूर्वक धम्मदान
स्वीकारण्यात यावे
३) संकलित निधीचा विनियोग करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने व जयंती उत्सव संदभनि संकलित केलेला निधी सामाजिक ठेव अनामत ठरत असल्याने विधायक व आदर्श उपक्रमासाठी यथायोग्य खर्च कावा ही अपेक्षा
४) डॉ. बाधारतहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मिरवणुकीत हदये बंद पडून जीवावर बेतणारे डीजे सारखे कर्णकर्कश भोंगे, स्पोकर, आवाज कटाक्षाने टाळावेत.
५) डॉ. बाबासाहेच आंबेडकर यांच्या प्रतिमा मिरवणुकीत अश्लील गाण्याच्या ध्वनिमुद्रिका टाळण्यात पाण्यात व गाण्याच्या तालावरील बेधुंद नृत्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा व नावाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मिरवणुकोचा अपमान आहे याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.
६) जयंती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक मात्र त्याची नेत्याची, पूढान्यांची, व कार्यकर्त्यांची असे होता कामा नये दुर्दैवाने असेच प्रकार निदर्शनास येत आहेत.
७) व्याख्याने भीम गीते, भीम गीत स्पर्धा, विद्याध्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा, खेळ स्पर्धा, विद्यार्थिनी साठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा याबरोबरच समाजातील गरीब व होतकरू गुणवत्ताधारक विद्यार्थी विद्यार्थिनीना अर्थसहाय्य व त्यांचा गौरव करून सत्कार कावेत.
८) महाराष्ट्रात आणि ठिकाणी जयंती मंडळांनी शिल्लक राहिलेल्या निधीतुन बुद्ध विहार बांधले आहेत, वाचनालय चालविली जात आहेत हे आदर्श इतर जयंती मंडळांनी अनुकरणासाठी समोर ठेवावेत.
कोणत्याही कार्यक्रमाच्या संदभनि उदाः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, गौतम बुद्ध जयंती, बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन, माता रमाई आंबेडकर जयंती, भैव्यासाहेब आंबेडकर जयंती व इतर कोणतेही सभा परिषदा संदभनि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेले डिजिटल लावण्यात येतात पण दुर्दैवाने डिजिटल पुढाऱ्याच्या प्रतिमा मोठ्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा लहान अवया खालच्या भागात दर्शविल्या जातात पा बाबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा व विचारांचा अवमान करणान्या आहेत कृपया हे टाळण्यात यावे,
बौद्धतर समाजांना, नागरिकांना आदर वाटावा असे श्रद्धायुक्त कार्यक्रम आंबेडकर प्रेमी जनतेकडून संपन्न व्हावेत असे वाटणे गैर आहे असे वाटत नाही.
प्रत्येक जयंती मंडळाने संघटनाने संकलित केलेल्या निधी व विनियोगाचा हिशोब त्या त्या मंडळापुढे व समाजापुढे सादर करणे ही स्वच्छ कारभाराची निशाणी आहे हे विसरता कामा नये.
बंधू, भगिनीनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व विचार यावर विशिष्ट व्यक्तो, जात, पक्ष, समाज धर्म यांचा हक्क व अधिकार नसून भारतरान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थान ठरले आहेत सबब त्यांचे संदभर्भात जे काही चांगले आदर्श विधायक घडते त्याबद्दल गौरवोद्गार काढले जातीलच पण त्याबरोबर अपमानकारक काय पडत असेल तर दोष दिग्दर्शन करण्याचा किया संदभनि अपेक्षा व्यक्त करण्याचा जगातल्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहेच आहे.
लेखक ‘ हरीभाऊ साधुराव बनसोडे .मो.नं. ८९९९५८६३२२