धाराशिव प्रतिनिधी – : बौद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन केली आहे
निवेदनात म्हटले आहे की,इतर धर्मांची धार्मिक स्थळे त्यांच्या ताब्यात असताना,महाबोधी विहारावर मात्र बौद्ध समाजाचा हक्क का नाही?”असा प्रश्न उपस्थित करत जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी केंद्र सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केली.
१९४९ चा महाबोधी विहार कायदा रद्द करून हे ऐतिहासिक धार्मिक स्थळ बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे.महाबोधी विहार हे जागतिक बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान आहे आणि त्यावर बौद्ध समाजाच हक्क असावा असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
बौद्ध समाज गेल्या अनेक वर्षांपासून शांततेच्या मार्गाने ही मागणी करत आहे.आमची मागणी न्याय्य आहे,त्यामुळे केंद्र सरकारने यावर तात्काळ कारवाई करावी
बौद्ध समाजाने सरकारकडे विनंती केली की,या मुद्द्यावर तातडीने निर्णय घेऊन महाबोधी विहार आमच्या ताब्यात द्यावे जेणेकरून आमचे धार्मिक हक्क सुरक्षित राहतील.” यावेळी निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,अल्पसंख्याक समाजाचे आजीज महेबूब पठाण, धर्मराज कदम,हरिभाऊ बनसोडे,माळुंब्रा ग्रा.स.धनराज तुळशे,वाधुंबर मिसळे स्वाक्षर्या आहेत






