धाराशिव प्रतिनिधी. दि ८ एप्रिल जिल्हाधिकारी कार्यालय आणि मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने अमृत सरोवर २.० योजनेचे उद्घाटन आज धाराशिव तालुक्यातील सिंगोली सिंचन तलाव येथे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव व मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांची प्रमुख उपस्थिती होती.




या योजनेतून सिंगोलीत सिंचन तलावातून ५० हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे.या गाळ काढण्याच्या कामामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला तहसीलदार मृणाल जाधव,उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री.बोरावके आयएससी प्रकल्प पुणेचे प्रकल्प व्यवस्थापक अमित बिराजदार, सिंगोली ग्रामविकास अधिकारी विजय नलवडे,ग्राम महसूल अधिकारी मनोज राऊत,राहुल शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणपत मगर तसेच कंपनीचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.






