वागदरी ( एस.के. गायकवाड ):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) नळदुर्ग (ता. तुळजापूर) शहर शाखेच्या वतीने ऑड.शांतीबल कांबळे अणदूर यांचा नळदुर्ग येथिल डॉ. आंबेडकर इंटर नॅशनल इग्लिश मेडीयम स्कूल येथे सत्कार करण्यात आला.
अणदूर ता.तुळजापूर येथिलं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अँड.शांतीबल कांबळे याना नुकतेच नोटरी मिळाल्या बद्दल व त्याची धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल विभागात कायदे विषयक सल्लागार म्हनूण निवड झाल्या बद्दल तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिपाइं( आठवले) नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने येथील
डॉ.आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मेडीयम स्कूल येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात
आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं युवा अघाडी जिल्हा कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य अरुण लोखंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शशिकांत साबळे हे होते.प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सत्कार मूर्ती अँड. शांतीबल कांबळे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइं (आठवले)चे नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे यानी केले तर सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड यानी केले व अभारप्रदर्शन अणदूरचे माजी सरपंच प्रबोध कांबळे यानी केले. या वेळी मुख्याध्यापक रविंद्र डावरे, उद्योजक मनोहर बनसोडे, पत्रकार राजू मुकरे,प्रा.डॉ.दयानंद कांबळे,प्रा.भास्कर वाघमारे, पारधी अदिवासी संघटनेचे संस्थापक पंडित भोसले, सह शिक्षक अमर घोडके, नागनाथ सुर्यवंशी सह कार्यकर्ते उपस्थित होते