spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग येथे ऑपरेश शिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली 

वागदरी ( एस.के. गायकवाड): देशातील भारतीय सैनिकाने ऑपरेशन शिंदूर यशस्वीपणे राबविल्याच्या समर्थनार्थ सैनिकाचे अभिनंदन करण्यासाठी व ऑपरेशन दरम्यान शहीद झालेल्या जवानाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नळदुर्ग ता. तुळजापूर येथे तिरंगा रॅली काढण्यात आली होती.

या वेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देत नळदुर्ग येथिल किल्ला गेट येथून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली व मुख्य बाजारपेठ येथून ते एसटी स्टँड समोर या रॅलीचा समारोप करण्यात आला.या प्रसंगी भारत माता की जय,वंदे मातरम,जय जवान जय किसान,च्या घोषणेने नळदुर्ग शहर दनाणून गेले होते.या तिरंगा रॅलीमध्ये माजी नगर अध्यक्ष उदय जगदाळे माजी उपनगराध्यक्ष नय्यर जागीदार, दीपक अलुरे,पत्रकार,विलास येडगे,दादासाहेब बनसोडे,उत्तम बनजगोळे,बंडू कसेकर,महादेव सालगे,साहेबराव घुगे,रिपाइंचे बाबासाहेब बनसोडे,माजी नगरसेवक विनायक अहंकारी, माजी नगरसेविका छमाबाई राठोड,कल्पना गायकवाड,सुशांत भूमकर श्रमिक पोतदार सह नळदुर्ग परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शेवटी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनायक आंकारी यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या