spot_img
spot_img
spot_img

पारधी समाजातील तरुणानी शिक्षण घेवून चोरीचा शिक्का पुसून काढावा : पद्मश्री गिरीश प्रभुणे

 

वागदरी (एस.के.गायकवाड ):

महामानव डॉ.बाबासाहेबआंबेडकर यानी संविधानाच्या माध्यमातून सर्वांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिलेली असून परधी समाजातील तरुणानी अवैध धंदे बंद करून शिक्षण घेवून भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवा कारून, तसेच प्रशासकीय सेवेत रुजू होऊन, वेगवेगळे छोटे मोठें व्यवसाय करून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेल्या पारधी समाजाच्या कपाळावर इंग्रजाणी मारलेला चोरीचा शिक्का पुसून काढावा आणि स्वतःची पर्यायाने समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन पुनरुत्थान समरसता कुरूकूलम पिंपरी – चिंचवड पुणे चे संस्थापक तथा क्रांती वीर चाफेकर स्मारक समितीचे निर्माते पद्मश्री पुरस्कार प्राप्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे काका यानी इटकळ ता.तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

  आदिवासी पारधी समाज बहूउद्देशिय सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अणदूर ता. तुळजापूर च्या वतीने इटकळ येथिल एकता मंगल कार्यालयाच्या सभाग्रहात आदिवासी पारधी समाजाचा मेळवा व पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा जाहीर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गिरीश प्रभुणे काका मेळाव्याला मार्गदर्शन करताना बोलत होते.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अणदूर येथिल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महावीर कंदले हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ समाज सेवक महादेव गायकवाड गुरुजी,पारधी समाज संघटनेच्या महिला अध्यक्ष्या सुनिता भोसले आदी उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीविर बिरसा मुंडा आदी महामानवांच्या प्रतिमांचे उपस्थित मांन्यवरांच्या हस्ते पुजन करून मेळव्याचे उदघाटन करण्यात आले.या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक पद्मश्री गिरीष प्रभुणे यांचा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित भोसले यांच्या हस्ते तर महावीर कंदले, महादेव गायकवाड,सुनीता भोसले,रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,रिपाइचे जिल्हा युवा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, आदींच्या प्रमुख उपस्थित मानाचा फेटा, शाल, पुष्पहार, पुष्पगुछ व मानपत्र देवून यथोचित सत्कार करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित भोसले यांनी केले तर सुत्रसंचलन व अभारप्रदर्शन पत्रकार भैरवनाथ कानडे यानी केले तर मानपत्राचे वाचन सामाजिक कार्यकर्ते तथा अणदूर चे माजी सरपंच प्रबोध कांबळे यानी केले. 

‘यावेळी आदिवासी पारधी सामाजिक सघटनेचे प्रदेश सचिव कुदन भोसले,पत्रकार किशोर धुमाळ, रिपाइंचे राजेंद्र शिंद,महादेव कांबळे आदिवासी पारधी सामाजिक सघटनेचे प्रदिप भोसले, रवी भोसले, बाळु भोसले, जेवर काळे,तनुजा काळे,चित्रा काळे,रमेश पवार, जगन्नाथ शिंदे, उमेश भोसले, सिद्धाराम चव्हाण, पिंकी शिंदे, सचिन शिंदे,सह कार्यकर्ते महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या