spot_img
spot_img
spot_img

तुळजापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भारत जिंदाबाद यात्रा संपन्न

वागदरी ( एस.के. गायकवाड) 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्यावतीने सिंदूर ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या भारतीय जवानाच्या सन्मानार्थ भारत जिंदाबाद यात्रा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार तुळजापूर तालुका रिपाइंच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली. 

  (दि ५) जून गुरूवार रोजी तुळजापूर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भारत जिंदाबाद यात्रा डॉ आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदि मार्गावरून काढून तहसील कार्यालय समोर या भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली. 

यावेळी तुळजापूर शहरातील माजी सैनिक प्रकाश भांजी,हणमंत चव्हाण,अरूण माने दत्ता नवगिरे आदि माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला

   यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा प्रदेश कार्याध्यक्ष आनंद पांडागळे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, जिल्हा सचिव एस. के गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, युवक तालुका सरचिटणीस शुभम कदम, शरद कदम, रमेश गायकवाड, सुरेंद्र सुरवसे, महादू सोनवणे, विजय गायकवाड, बापू मोटे किसन पांडागळे, प्रहारचे तालुकाध्यक्ष मारूती पवार, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र साळुंके, अरविंद लोखंडे, राजेंद्र शिंदे, चोखोबा सिरसट, संजय गायकवाड, भिमराव सोनवणे, दादासाहेब बनसोडे, आदिंसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या